घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महेश थोरवे ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्काराने सन्मानित (वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे )

कर्तव्यनिष्ठ सेवा, धाडस आणि लोकाभिमुख कार्यशैलीच्या जोरावर लक्ष्मी नगर, येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक
( फौजदार )महेश शामराव थोरवे यांना ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र 2026’ या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महेश थोरवे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाचे नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील लक्ष्मी नगर, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रुजू होताच आपल्या कार्याची वेगळी छाप पाडली. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना त्यांनी दाखवलेली तत्परता, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याची संवेदनशीलता आणि न्याय देण्याची ठाम भूमिका यामुळे ते सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणा, निडर वृत्ती आणि सेवाभावी दृष्टिकोनामुळे ते पोलीस दलातील एक आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कामगार दिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात हा सन्मान सोहळा पार पडला. येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक मा. श्री. शमाकांत शेडगे यांच्या हस्ते महेश थोरवे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भुमाता ब्रिगेडच्या संस्थापिका मा. सौ. तृप्तीताई देसाई, लक्ष्मी नगर, पोलीस स्टेशन पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, येरवडा पोलीस स्टेशन, पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंजुम बागवान तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष आदम सय्यद व उपाध्यक्ष सतीश राठोड यांची उपस्थिती होती.
त्यांचे राहते गाव वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील ग्रामस्थ, तसेच थोरवे परिवार आणि त्यांच्या कार्यरत पोलीस स्टेशनकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व्याहळी कॉलनी ग्रामस्थांनीही त्यांच्याबाबत गौरवोद्गार काढत, “महेश थोरवे सारखे सुपुत्र आमच्या गावाला लाभले हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,” असे भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक महेश थोरवे यांनी नम्रपणे प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा पुरस्कार मी माझ्या गावच्या ग्रामस्थांना व माझ्या कुटुंबाला समर्पित करतो.” त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें