घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पश्चिम भागातील युवा नेतृत्व ज्ञानदेव शेठ सणस यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ( वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. ज्ञानदेव शेठ सणस यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दरे येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वाई तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानदेव शेठ सणस यांच्या पक्षप्रवेशामुळे वाई तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विशेषतः पश्चिम भागात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षप्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्ञानदेव शेठ सणस यांच्यासारखे सामाजिक भान असलेले नेतृत्व शिवसेनेत आल्याने वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पक्ष अधिक मजबूत होईल. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल.”
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ज्ञानदेव शेठ सणस म्हणाले, “माझा निर्णय कोणत्याही पदासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून जनतेच्या विकासासाठी आहे. पश्चिम भागातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सक्रियपणे काम करणार आहे.”
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सणस कुटुंबाचे सामाजिक कार्य अत्यंत मोठे आणि प्रभावी मानले जाते. विविध गावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून ज्ञानदेव शेठ सणस यांची ओळख निर्माण झाली आहे. युवक, शेतकरी, ग्रामीण विकास, सामाजिक उपक्रम तसेच जनसामान्यांच्या अडचणींवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, त्यांच्या कार्यामुळे पश्चिम भागात त्यांना मोठा जनाधार मिळाला आहे.
शिवसेनेत प्रवेश करताना त्यांच्या समवेत पश्चिम भागातील अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम भागातील राजकीय आणि सामाजिक स्तरावर या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा रंगली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें