घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मोहरी बुद्रुकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न.


पुरंदरची ज्योत अन् शिवशंभूंच्या जयघोषाने गुंजन मावळ दुमदुमले

भोर प्रतिनिधी उमेश अहिरे

राजगड तालुक्यातील गुंजन मावळ खोऱ्यातील मोहरी बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले पुरंदर येथून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत आणि ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिरात झालेला जलाभिषेक यांमुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि स्फूर्तीदायक वातावरण निर्माण झाले होते. गावात भगवेमय वातावरण अन् भव्य मिरवणूक उत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण मोहरी बुद्रुक गाव भगव्या ध्वजांनी सजवण्यात आले होते. महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून शिवशंभूंचे स्वागत केले. ऐतिहासिक अमृतेश्वर (महादेव) मंदिरातून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. व्याख्यानातून मांडला शंभूराजांचा जीवनपट या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जेजुरी येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट ग्रामस्थांसमोर मांडला. “पुढची पिढी घडवताना ती शंभूराजांसारखी आज्ञाधारी, चारित्र्यसंपन्न आणि प्रखर देशभक्तीने प्रेरित असायला हवी. स्वराज्याचे विचार घराघरांत पोहोचवणे हीच काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जगताप यांनी यावेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने तरुणांसाठी विविध पारंपारिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांसाठी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट दाखवण्यात आला, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जाज्वल्य विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. या सोहळ्यासाठी मोहरी बुद्रुक आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें