सातारा : राष्ट्रीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. बन्सी (दादा) डोके यांच्या आदेशानुसार तसेच सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विक्रम (दादा) वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसार व धोरणांनुसार कार्य करण्याची इच्छा असलेल्या सर्व कार्यकर्ते, कार्यकर्त्या तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या इच्छुक पदाधिकाऱ्यांनी स्वतःची वैयक्तिक तसेच सामाजिक कार्याची माहिती लिखित स्वरूपात सोबत आणावी, असेही आयोजकांनी कळविले आहे. कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू होणार असल्याने सर्वांनी वेळेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी विवेक जाधव (७०५७२७९०७६), अतुल शिंदे (९५५२६०८८८०) आणि वैभव जाधव (८७८८००१९२०) यांच्याशी संपर्क साधावा.
“जय भवानी, जय शिवराय” अशा घोषणेसह राष्ट्रीय मराठा महासंघ, सातारा यांच्या वतीने कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.











