घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाईच्या कवी विकास घोणे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट काव्य जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान (वाई प्रतिनिधी)

के. एस. आय. पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात वाई येथील कवी व साहित्यिक तसेच नगरपालिका शिक्षण मंडळ, वाई येथून सेवानिवृत्त शिक्षक श्री. विकास तुकाराम घोणे यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे वाई तालुक्याच्या साहित्य क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करवीर वाचन मंदिर, महालक्ष्मी मंदिराजवळ, कोल्हापूर येथे पार पडलेल्या या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत मा. मातृभक्त आचार्य शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे), मा. डॉ. मधुकर बाबुराव हुजरे (धाराशिव), मा. श्री. सुधाकर बाबुराव शिंदे (इचलकरंजी) तथा कवी सरकार श्री. विलास पाटील इंगळी यांच्या शुभहस्ते श्री. घोणे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. घोणे यांच्या साहित्यामध्ये मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, नाती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे प्रभावी चित्रण आढळते. ग्रामीण भागातील समस्या, कष्टकरी जीवन, नारीत्वाचा सन्मान आणि समाजप्रबोधन यावर आधारित त्यांच्या लेखनामुळे वाचकांमध्ये विचारांची जागृती निर्माण होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
त्यांच्या साहित्यकृतींमधून मातीचा सुगंध, वास्तववादी जीवनचित्र आणि समाजाला दिशा देणारे विचार प्रभावीपणे मांडले जात असल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या यशाबद्दल साहित्य, शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून श्री. विकास घोणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें