घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यान ७२० मीटर कामाला गती

मुळा–मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत आहे. ‘संगमवाडी ते येरवडा’ या पहिल्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर असतानाच आता ‘वाकड बाह्यवळण ते सांगवी पूल’ या दुसऱ्या टप्प्यालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानच्या ७२० मीटर अंतरातील काम या आठवड्यात पुणे महापालिकेने हाती घेतले आहे.

पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते येरवडा, तसेच बंडगार्डनपर्यंत नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम सुरू असून, नदीकाठालगत उद्याने, सायकल ट्रॅक यांसारखी महत्त्वाची कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे सध्या सुरू आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील नदीकाठ परिसराचा चेहरामोहरा बदलत असून नागरिकांसाठी सुरक्षित व पर्यावरणपूरक सुविधा निर्माण होत आहेत.

दरम्यान, महापालिकेने काही महिन्यांपूर्वी वाकड बाह्यवळण ते सांगवी पुलादरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची घोषणा केली होती. या टप्प्यासाठी २९७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. वाकड बाह्यवळण ते सांगवी पूल हा सुमारे आठ किलोमीटरचा टप्पा असून, यामधील पुणे महापालिकेच्या हद्दीतील नदीकाठ सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात आहे.

मागील वर्षी या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने सर्वेक्षण हाती घेतले होते. जमिनीची पातळी मोजणे, झाडांचे सर्वेक्षण करणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानची ७२० मीटर जागा उपलब्ध झाली. त्यानुसार या आठवड्यात या भागातील नदीसुधार कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

या टप्प्यात नदीकाठावरील संरक्षक भिंत उभारणे, भराव करणे, नदीकाठ संरक्षणासाठी दगडांनी भरलेली गॅबियन तटबंदी उभारणे, तसेच लँडस्केपिंगची कामे केली जाणार आहेत. या प्राथमिक कामांनंतर उर्वरित भागातील नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

असे असणार काम…

वाकड बाह्यवळण ते सांगवी पूल हा आठ किलोमीटरचा नदीकाठ सुधार प्रकल्प आहे. या टप्प्यात मुळा नदीच्या डाव्या बाजूचे काम पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या हद्दीत, तर उजव्या बाजूचे काम पुणे महापालिकेच्या हद्दीत येते. या प्रकल्पात खोदाई, माती व साहित्य वाहतूक, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक, गॅबियन वॉल, तसेच वृक्षलागवड यांचा समावेश आहे.

पर्यावरणपूरक विकासावर भर देत नदीकाठ अधिक सुरक्षित, सुशोभित व नागरिकांसाठी उपयुक्त बनवण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.यासंदर्भात माहिती देताना बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका यांनी सांगितले की, “मुळा–मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नदीकाठ सुधार प्रकल्पाचा दुसरा टप्पा वाकड बाह्यवळण ते सांगवीदरम्यान आहे. या टप्प्यातील बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानचे ७२० मीटरचे काम सुरू करण्यात आले असून पुढील टप्प्यांतील कामेही नियोजित वेळेत पूर्ण केली जातील.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें