घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कोयत्याने वार, बघ्यांची गर्दी… तो गयावया करत होता, पण…;

पुण्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत. एका तरुणावर पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. लाकूड तोडण्यासाठी आपण जसे घाव घालतो तसे घाव या तरुणावर घालण्यात येत होते. तो वाचण्यासाठी त्याच्या पाया पडत गयावया करत होता. बघ्याची मोठी गर्दी होती मात्र कोणी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला नाही.

आदित्य सुनिल कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मारहाणीत त्याच्या डोक्यात 30 पेक्षा अधिक टाके पडल्याची माहिती आहे. खुनी हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध मैत्रिणीस तक्रार देण्यास भाग पाडले म्हणून आदित्य याच्यावर हा कोणी हल्ला करण्यात आला आहे.

दरम्यान एवढा गंभीर प्रकार असताना देखील पोलिसांनी अद्याप याबाबत कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे. याबाबत केवळ इच्छापूर्वक हत्याराने जबर दुखापत करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें