घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्याची आज बत्तीगुल आणि मुख्य रस्ता ही बंद

मध्यवर्ती पेठा, सिंहगड रस्ता, नऱ्हे–आंबेगाव भागांत तब्बल ७ तास वीजपुरवठा बंददुरुस्ती कामासाठी महावितरणाचा नियोजित निर्णय

पुणे | प्रतिनिधीपुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील मध्यवर्ती पेठांसह नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) आणि नऱ्हे–आंबेगाव परिसरातील अनेक भागांत आज गुरुवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

महावितरणच्या पर्वती विभागांतर्गत वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे नियोजित काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात येत असल्याची माहिती पर्वती विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

कोणत्या कामासाठी वीजपुरवठा बंद ?

पर्वती विभागांतर्गत येणाऱ्या

२२/११ के.व्ही. क्षमतेच्या नवी पेठ व तक्षशिला वीजवाहिन्या

तसेच ११ के.व्ही. क्षमतेच्या तरुण भारत व विठ्ठलवाडी वीजवाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

या कामांमुळे संबंधित वीजवाहिन्यांवरून वीजपुरवठा होणाऱ्या परिसरात दिवसभर वीजपुरवठा विस्कळित राहणार आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

या भागांत आज वीजपुरवठा राहणार बंद

मध्यवर्ती पुणे पेठा नवी पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मी रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता परिसर

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड परिसर), धायरी, नऱ्हेगाव, आंबेगाव, कात्रज चौक, आनंदनगर, जनता वसाहत परिसर महावितरणकडून नागरिकांना अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवे घाट आज तीन तास वाहतुकीसाठी बंद

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ब्लास्टिंगद्वारे रस्ता रुंदीकरण

दरम्यान, पुणे–सासवड मार्गावरील दिवे घाटात आज गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर महामार्गावरील दिवे घाटात रस्ता रुंदीकरणासाठी नियंत्रित स्फोट (ब्लास्टिंग टेक्नॉलॉजी) वापरून डोंगर फोडण्याचे काम केले जाणार आहे.

या कालावधीत दिवे घाटातून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्ग व्यवस्था

दिवे घाटाऐवजी कोंढवा–बोपदेव घाट मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे

पुणे–सासवड दरम्यान धावणाऱ्या एसटी व पीएमपी बस सेवाही बोपदेव घाट मार्गे वळविण्यात येणार आहेत

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पुणेकरांनो, आजचा दिवस नियोजन करूनच घराबाहेर पडा!वीजपुरवठा व वाहतूक बंदीमुळे गैरसोय टाळण्यासाठी आधीच तयारी ठेवा.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें