घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

होलिका दहनात ‘वाईट गोष्टी दहन’ उपक्रम; अपना घर फाउंडेशनचा समाजजागृतीचा संदेश

होलिका दहन निमित्त ‘वाईट गोष्टी दहन’ उपक्रम अपना घर फाउंडेशन, तर्फे रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होळी सणाच्या निमित्ताने होणाऱ्या होलिका दहन कार्यक्रमात अपना घर फाउंडेशन, तर्फे “वाईट गोष्टी दहन” हा सामाजिक जनजागृती उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील वाईट प्रवृत्ती, नकारात्मक विचार, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, मत्सर, द्वेषभावना यांसारख्या गोष्टींचा त्याग करून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याचा संदेश देणे हा होता. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी कागदावर आपापल्या वाईट सवयी किंवा नकारात्मक गोष्टी लिहून त्या होलिकेच्या अग्नीत अर्पण केल्या आणि नवीन सुरुवातीचा संकल्प केला.
कार्यक्रमात महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजात प्रेम, एकोपा आणि सद्भावना वाढवण्याचे आवाहन केले.
आपलं घर फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें