घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा सावट पुण्याच्या उद्योगांवर

अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचे पडसाद पुण्यातील उद्योगक्षेत्रावर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील तब्बल ४७ टक्के उद्योगांवर या घडामोडींचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यापैकी २१.२ टक्के उद्योगांना तीव्र फटका बसण्याची शक्यता असून, २५.८ टक्के उद्योगांवर सौम्य परिणाम अपेक्षित आहे.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) सध्याच्या युद्धाचा स्थानिक उद्योगांवर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण केले. येथील ६६ कंपन्यांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्चा माल, इंधनदर आणि निर्यात-आयात साखळीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. या सर्वेक्षणात युद्धाचा तीव्र नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत २१.२ टक्के उद्योगांनी नोंदविले. याच वेळी युद्धाचा सौम्य नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचे २५.८ टक्के उद्योगांनी सांगितले. युद्धाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे ४१ टक्के उद्योगांचे मत आहे.

युद्धाचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत ६ टक्के उद्योगांनी नोंदविले आहे. त्यामध्ये ३ टक्के उद्योगांवर सौम्य सकारात्मक आणि ३ जास्त सकारात्मक परिणाम होईल, असे म्हटले आहे.आखातातील जलवाहतूक ठप्प झाल्यास इंधनासह विविध वस्तूंच्या आयात-निर्यातीवर थेट परिणाम होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पॉलिमरसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत पुढील दोन ते तीन दिवसांत सुमारे १० टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले.

परिणामी, सध्याच्या दराने स्वीकारलेल्या आॅर्डर पूर्ण करणे कठीण जाईल, असा इशारा उद्योगांकडून देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे उद्योगांवर तीव्र नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही मत व्यक्त झाले.’युद्धाचे परिणाम तात्काळ जाणवणार नाहीत; काही काळानंतर त्याची तीव्रता स्पष्ट होईल. सध्या परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करणे अवघड आहे. काही भागांत जलवाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी काळात मालवाहतुकीवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असलेला कच्चा माल कमी झाल्यानंतर उत्पादक कंपन्यांना पूर्वीच्या आॅर्डरची पूर्तता करणे अधिकच कठीण होईल,’ अशी निरीक्षणेही सर्वेक्षणात नोंदविण्यात आली आहेत.

युद्धपरिस्थितीवरीलसर्वेक्षणाचे प्रतिसाद

परिणामाचे

स्वरूप प्रतिसादांची

संख्या

कोणताही

परिणाम नाही ३१

किंचित नकारात्मक १७

अत्यंत नकारात्मक १४

किंचित सकारात्मक २

अत्यंत सकारात्मक २

एकूण प्रतिसाद ६६

सध्या अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती जोरात वाढत आहेत. यामुळे पेट्रोल-डिझेलसह पॉलिमर (प्लास्टिक) उत्पादनासाठी लागणारा पेट्रोकेमिकल्सचा कच्चा माल महाग होतोय, कारण हे सगळे तेलावर अवलंबून असते. आपल्या निर्यातीतील मोठा भाग खाडी मार्गाने जात असल्याने आणि दुबईसारख्या पोर्टवर अवलंबून असल्याने तात्पुरती अनिश्चितता जाणवणे स्वाभाविक आहे. अपेक्षा आहे की, हा संघर्ष निवळेल व परिस्थिती लवकर स्थिर होईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें