घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सोमवार दि.९ पासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात ( Pune News)आली आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा परवाने कोणत्या निकषांवर द्यावेत, याबाबत सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाचे पुण्यातील विविध रिक्षा संघटनांनी स्वागत केले असून त्यामुळे शहरातील वाढत्या रिक्षांच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने २०१७ मध्ये रिक्षा परवाने खुल्या पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पुण्यात सुमारे ४७ हजार रिक्षा होत्या. मात्र, त्यानंतर रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत गेली.सध्या पुण्यात सुमारे १ लाख ४२ हजार रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. वाढत्या रिक्षांमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अनेक रिक्षा संघटनांनी खुला परवाना बंद करण्याची मागणी केली होती. यासाठी वेळोवेळी आंदोलनही करण्यात आले होते.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यांना स्थानिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.

मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६७ (३) अंतर्गत राज्य सरकारांना प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

दरम्यान, काही ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक रिक्षा परवाने देण्यात आल्याच्या तसेच काही परवाने अवैधरित्या दिल्याच्या तक्रारीही सरकारकडे प्राप्त झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. सध्या राज्यभरात सुमारे १४ लाख ऑटो रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये रिक्षा परवान्यांचा प्रश्न स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विचार करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें