घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आत्मविश्वासपूर्ण रोडमॅप मांडत राज्याच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26 जानेवारी 1950 रोजी अंगीकारलेल्या भारतीय संविधानामुळे देशाला मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली असून त्याच लोकशाही मूल्यांच्या आधारावर महाराष्ट्र सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. संविधान हे देशाच्या एकात्मतेचे व विकासाचे भक्कम अधिष्ठान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या दावोस परिषदेत महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाल्याची माहिती दिली. या गुंतवणुकीचा लाभ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच कोकण या सर्व भागांना होणार असून राज्यभर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी, आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, नदीजोड प्रकल्प, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे राज्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होत असल्याचे नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला. “आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत,” असे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासन समन्वयाने काम करत असून आगामी काळात महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें