घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्याने औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता पहिल्या बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह आनंद छाजेड, शिरीष नाईकरे, रिपाई शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे, मनोज दळवी, वसंत जुनावणे, निलेश गायकवाड, सुजाता पाटील, सूर्यकांत कळापुरे, सतीश तारू, मारुती पाटील, जॉन प्रकाश, मंगल जाधव, सुरेखा कुलकर्णी तसेच स्थानिक नागरिकआणि पीएमपीएमएल अधिकारी  उपस्थित होते.

डीपी रोड परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही सेवा सकाळी ५.३० ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू राहणार असून या मार्गावर दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे औंध-बाणेर ते डेक्कन परिसरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट 

*नगरसेवकांचा तिकीट काढून प्रवास*पीएमपी च्या नवीन बस मार्गाचा शुभारंभ झाला की अधिकारी, नेते हिरवा झेंडा काढून थांबतात. मात्र आज सनी निम्हण, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह आनंद छाजेड यांनी तिकीट काढून पहिल्या बस फेरी मध्ये सामान्य नागरिकांसोबत प्रवास केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें