:कात्रज येथील महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था संचलित गगनगिरी बालक मंदिर प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी माध्यम शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी, समूहगान, देशभक्तीपर गीते, नृत्य, सामूहिक कवायत आदी विविध कला-गुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीच्या वातावरणात संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.
संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीचा उल्लेख करत, मुख्याध्यापक श्री. अजिनाथ चव्हाण व श्री. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास सातत्याने होत असल्याचे नमूद केले. त्यांनी शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांचे विशेष कौतुक केले.यावेळी रोटरी क्लब ऑफ सारसबाग व संस्थेच्या वतीने भविष्यात संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या कार्यक्रमाला महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे युवा नेतृत्व अक्षय रवींद्र वाघ, माजी नगरसेवक शंकरराव बेलदारे पाटील, इनरव्हील क्लबच्या सदस्या सौ. सुविधा नाईक, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय कपिले, महेश किवडे, अनुसूचित जाती-जमाती हवेली भाजप अध्यक्ष दिनेश गंगावणे, भाजप संपर्क प्रमुख महेंद्र फुंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद खुडे, माजी विद्यार्थी प्रकाश खुटवड, दैनिक लोकमतचे पत्रकार संतोष गाजरे, कात्रज न्यूज नेटवर्कचे संचालक व संपादक सागर गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक मोहनराव खैरे सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुर्वे यांनी केले, तर सोनाली मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.












