पुणे : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वावरच विश्वास दाखवण्यात आला आहे. अध्यक्षपदी श्री शशिकांत शिंदे तर सचिवपदी श्री अरविंद मोडक यांची एकमताने सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
आझम कॅम्पस, पुणे येथे पार पडलेल्या या निवडणुकीस राज्याध्यक्ष जी. के. थोरात व राज्य सचिव के. एस. ढोमसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणे विभागाध्यक्ष शिवाजीराव कामथे व विभागीय सचिव सचिन दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
यावेळी पुणे शहर टीडीएफ तसेच माध्यमिक शिक्षक संघाच्या विविध घटकांच्या कार्यकारिण्याही जाहीर करण्यात आल्या.१९६२ साली स्थापन झालेली महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी ही शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणारी राज्यातील जुनी व प्रभावी संघटना मानली जाते. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आगामी काळात शहरातील प्रत्येक शाळेत संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यात येईल. शिक्षकांच्या प्रत्येक समस्येला प्राधान्य देऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”या निवडणुकीत निरीक्षक म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप व जिल्हा टीडीएफचे सचिव तानाजी झेंडे यांनी जबाबदारी पार पाडली.
राज्याध्यक्ष जी. के. थोरात, राज्य सचिव के. एस. ढोमसे तसेच पुणे विभागाध्यक्ष शिवाजीराव कामथे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रभावी काम करण्याचे आवाहन केले.
शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) पुणे शहर ज्युनियर कॉलेज कार्यकारिणी
अध्यक्ष : श्री शशिकांत शिंदेसचिव : श्री अरविंद मोडककार्याध्यक्ष : श्री रावसाहेब पाटील
उपाध्यक्ष :श्री दिलीप मोडक,श्री जमिल नाल्लाबदू,डॉ. स्मिता खोपडेखजिनदार : श्री विनोद महाजन
सहखजिनदार : श्री सुभाष राठोडसहसचिव :श्री अनिल दरेकर,श्री अभिषेक लोखंडे
सोशल मीडिया प्रमुख : श्री पृथ्वीराज जाधवसंघटक :श्री विजय लोंढे,श्री बालाजी दाहकले,श्री विजय मराठे,श्री सुनील गुरव,श्रीमती साक्षी नलावडे,श्री साईनाथ तांबे
अंतर्गत हिशोबनीस : श्री जाधव विनोदजिल्हा प्रतिनिधी : डॉ. पांडुरंग कंदइतर निवडलेल्या पदाधिकारी
पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी :अध्यक्ष – संतोष थोरातकार्याध्यक्ष – रोहिदास भारमळसचिव – संदीप घोलप
माध्यमिक शिक्षक संघ :अध्यक्ष – संतोष दुर्गाडेसचिव – प्रशांत आबने
पुणे शहर महिला टीडीएफ :अध्यक्ष – भारती राऊतसचिव – उज्वला हातागळेमहिला माध्यमिक शिक्षिका संघ :अध्यक्ष – डॉ. मंगल शिंदेसचिव – तृप्ती राऊतअंशतः अनुदानित व विनाअनुदानित टीडीएफ :अध्यक्ष – बाळासो इमडेसचिव – बाळासाहेब ढोरमारेशारीरिक शिक्षक टीडीएफ :अध्यक्ष – संजय कांबळेसचिव – धनंजय मदने












