घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

फडणवीसांकडील खात्यात ‘ACB’ ची धडक कारवाई

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्याला क्लर्कला काही दिवसांपूर्वी एसीबीकडून अटक झाली होती. ज्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तर मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आता हे प्रकरण पूर्णपणे शांत झाले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या अर्थ आणि नियोजन खात्यातील बडा अधिकाऱ्याला अटक झाली आहे.

निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) खारघर परिसरात कारवाई करत त्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव विलास लाड असे असून तो कक्ष अधिकारी या पदावर आहे. Maharashtra officer caught red handed with cash during ACB operationकाहीच दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात ACB ने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला अटक करण्यात आली होती. तर या लिपिकानं २५ हजारांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

प्रकरणानंतरच मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा राज्यभर चांगलाच गाजला होता. तर या मुद्द्यावर अधिवेशानात देखील जोरदार चर्चा झाली होती. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.आता हे प्रकरण शांत झाले असतानाच पुन्हा एकदा मंत्रालयातील खाबूगिरीचा मुद्दा समोर आला आहे.

मंत्रालयातल्याच एका अधिकाऱ्याला एसीबीने लाच घेताना अटक केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून खारघर परिसरात लाखोंची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे. विलास लाड असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी म्हणून हा कार्यरत आहे.लाड याने निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ज्याची तक्रार एसीबीकडे देण्यात आली होती.

या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून लाचखोर अधिकारी लाड याला खारघर परिसरात लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तर याबाबत मिळालेली माहिती नुसार मंत्रालयातून निधी मंजूर करून देण्यासाठी विलास लाड याने लाच मागितली होती. तर त्याला खारघर परिसरात एसीबीने ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

या घटनेनंतर आता राज्यभर खळबळ उडाली असून मंत्रालयातील कामासाठी लाच घेताना अशा पद्धतीने अधिकाऱ्याला अटक झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. तर अर्थ व नियोजन विभाग हा मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या खात्या अंतर्गत येत असल्याने यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याच खात्यावर वचक राहिली की नाही असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें