घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जम्मू-काश्मीर सीमेवर अपघात, कोल्हापूरच्या सुपुत्राला 27 व्या वर्षी वीरमरण

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावाचे सुपुत्र असलेले २७ वर्षीय जवान रोहित परशुराम खन्नीकुडे हे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना 16 एप्रिल रात्री 12 वाजता एका अपघातात शहीद झाले आहेत.

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 2020 मध्ये भरती झालेल्या रोहित यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. रोहित यांचे पार्थिव रविवारी सकाळी टाकळीवाडीला दाखल होईल. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

टाकळीवाडीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण श्री कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी येथे झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे, तर पदवीपूर्व श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे त्यांनी पूर्ण केले.

पुढे सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीत भरती होऊन तिथेच प्रशिक्षण घेतले. सैन्यात भरती झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश त्यानंतर चीन सीमेवरही ते कर्तव्यावर होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचा एक अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

रोहित यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. वडील परशुराम शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहेत. मुलगा गेला असला तरी देशासाठी प्राणार्पण केल्याने अभिमान वाटत असल्याच्या कुटुंबीयांच्या भावना आहेत. ग्रामस्थांनी खन्नीकुडे कुटुंबाच्या घरी भेटी देत सान्त्वन केले आहे.

रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाची माहिती मिळताच टाकळीवाडी गाव शोकमग्न झाले असून, जम्मू-काश्मीरमधून त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी येण्यासाठी निघाले असून रविवारी ते गावी दाखल होणार आहे. यावेळी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिक अधिकारीही रविवारी गावी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. रोहित यांच्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें