प्रतिनिधी – अमर पठारे
युवा क्रांती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब, राकेश वाघ साहेब तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली. मान्यवरांचे आगमन होताच ढोल-तुतारीच्या गजरात, आरती करून आणि फुलांचा वर्षाव करत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. या वेळी माननीय रविंद्र सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे आणि इतर मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून उपस्थितांना मोलाचे विचार दिले.

सर्व पदाधिकाऱ्यांसाठी ही भेट अत्यंत अविस्मरणीय ठरली. मान्यवरांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, तर मान्यवरही सर्वांना भेटण्यासाठी तेवढ्याच आत्मीयतेने सहभागी झाले. ही गाठभेट संपूर्ण युवा क्रांती परिवारासाठी एक अमूल्य आठवण ठरली. मेळावा यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेणाऱ्या मुंबईतील सर्व अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. मुंबई टीम – विशेष सहकार्य: मुंबई सचिव सोहरब मुजावर, गोपाळ चौधरी, दर्शन म्हात्रे, फिरोज शेख, प्रकाश पवार, अशोक चिक्की, संतोष देसाई, श्रुनाल नांगरे, जसविंदर सिंह, राणा, मयूर बांदेकर, वंदना म्हस्के, अमीना खान, आशा केळकर आणि शितीजा इंगवले, सोनाली सोलंकी, सुचित्रा रेडीयार, दीपा रामरख्यानी यांनी मोठे योगदान दिले. नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामराख्यानी यांनी प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष देत, नियोजनबद्ध पद्धतीने मेळावा यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनीही अथक परिश्रम घेतले. मुंबई युवा अध्यक्ष कुणाल शहा यांनी बॅनर तयार करण्या-पासून ते ठिकठिकाणी लावण्यापर्यंत तसेच मान्यवरांच्या येण्या-जाण्याचे उत्कृष्ट नियोजन केले. मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर आणि सोहरब मुजावर यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. स्वागत, आरती, शिस्तबद्धता, वेळेचे नियोजन आणि संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्टरीत्या सांभाळत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. “जय युवा क्रांती”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सर्व मान्यवरांचा गणपती बाप्पाची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी, युवा क्रांती अंतर्गत पोलिस मित्र फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












