घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आदर्श सरपंच पुरस्कारासाठी अटीत गावच्या रूपाली अंकुश जाधव यांची निवड

खंडाळा प्रतिनिधी दशरथ राऊत
खंडाळा पंचायत राज व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित आदर्श सरपंच पुरस्कार २०२६ यासाठी मु.पो. अतिट, ता. खंडाळा, जि. सातारा येथील सरपंच मा. रूपाली अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सरपंच परिषद महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गावपातळीवर पारदर्शक प्रशासन, जनसंपर्क वाढविणे, विकासकामांना गती देणे तसेच लोकांच्या मूलभूत प्रश्नांचे तत्पर निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रभावी कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते विकास, पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, स्वच्छता अभियान, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले आहे. गावातील महिला सक्षमीकरण,
युवकांसाठी रोजगार संधी आणि शैक्षणिक सुविधांमध्ये करण्यासाठी त्यांनी सुधारणा सातत्याने प्रयत्न केले आहेत.
या पुरस्काराचे वितरण समारंभ यशदा, पुणे येथे गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे, ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे तसेच
पद्मश्री पोपटराव पवार यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केवळ दहा सरपंचांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते, त्यामुळे हा सन्मान अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. रूपाली जाधव यांच्या निवडीमुळे खंडाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, सहकारी व विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामविकासाच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल, असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें