घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कॅब चालकाने मागितले दुप्पट भाडे, नकार दिल्यावर महिलेशी अश्लील वर्तन

पुण्यातील बाणेर परिसरात अ‍ॅपवरून कॅब बुक केल्यानंतर एका महिलेचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे. ओटीपी दिल्यानंतर कॅबचालकाने अचानक दुप्पट भाड्याची मागणी केली आणि त्याला विरोध केल्यावर भर दिवसा महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.फिर्यादी महिला 42 वर्षांच्या असून, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजता त्यांनी घरी जाण्यासाठी Uber अ‍ॅपवरून कॅब बुक केली होती. कॅब आल्यानंतर त्या वाहनात बसल्या आणि चालकाला ओटीपी सांगितला.

त्यानंतर चालकाने प्रवासाचे भाडे 700 रुपये असल्याचे सांगितले. अ‍ॅपमध्ये मात्र भाडे 350 रुपये दाखवत असल्याने महिलेने जादा रक्कम का मागितली जात आहे, अशी विचारणा केली.यावर चालकाने वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच महिला कॅबमधून उतरून पायी निघाल्या.

मात्र कॅबचालक त्यांचा पाठलाग करत रस्त्यातच त्यांच्या दिशेने अश्लील हावभाव आणि वर्तन करू लागला. भर रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरल्या. काही वेळानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेनंतर महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित उबेर कॅबचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें