घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पार्थ पवार यांना खासदार न करता त्यांच्यावर गुन्हा नोंदवा – अंजली दमानिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ ३ दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीला हरकत नसेल, तर पुणे भूखंड घोटाळ्याची चौकशी थांबवण्याची आवश्यकता नाही.त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी अंजनी दमानिया यांनी केली.

‘पार्थ पवार यांच्या विरोधात प्रलंबित असलेला प्रथमदर्शी माहिती अहवाल त्वरित प्रविष्ट करा आणि खारगे आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा’, अशा मागण्या करत दमानिया यांनी पार्थ पवार यांवर चौकशी चालू असतांना त्यांना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे असल्याचे सांगितले.

मुंढवा कोरेगाव पार्क परिसरातील भूखंड खरेदी विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहारात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे; मात्र पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दमानिया यांनी वरील मागणी केली.संपूर्ण घटनेची निष्पक्षपणे निश्चिती करून आरोपींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मुंढवा परिसरातील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले होते.

या प्रकरणी शीतल तेजवानी हिला मुख्य सूत्रधार आणि आरोपी ठरवण्यात आले असून, पुणे पोलिसांनी तिच्याविरोधात तब्बल १८८६ पानांचे विस्तृत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात मात्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही.या प्रकरणात यापूर्वी पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. मात्र आर्थिक गुन्हे विभागाच्या तपासात त्यांच्याविरोधात पुरावे न आढळल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही.

त्यामुळे या प्रकरणातून त्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “महाराष्ट्र हा राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यातील परस्पर दाखल दिवाणी दाव्यांचा उल्लेख करत, तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार अवैध ठरवून रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जाकडे लक्ष वेधले आहे. “मग या प्रकरणात जबाबदारी कोणाची? शिक्षा कोणाला?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.दरम्यान, ईओडब्ल्यू (खडक पोलीस ठाणे) कडून फक्त शीतल तेजवानीवरच आरोपपत्र दाखल झाल्याने, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीबाबत नव्या चर्चेला उधाण आले आहे. “हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे,” अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील न्यायालयीन कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें