घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात महापौरपदावरून भाजपमध्ये नाराजी

पुण्यात भाजपने महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे यांना संधी दिलीय. मंजुषा नागपुरे यांच्यासह तीन महिलांच्या नावांची चर्चा होती. पण भाजपने मंजुषा नागपुरे यांना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानं आता नाराजी उफाळून आलीय.

भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकिर या नाराज झाल्या आहेत. वर्षा तापकीर यासुद्धा महापौर पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या.

वर्षा तापकीर या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. आज महापौरपदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. पण नगरसेविका वर्षा तापकीर या उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, भाजपकडून महापौर व महापौर निवड बिनविरोध करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. पण काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं बिनविरोध निवडीला खो बसला आहे. भाजपाकडून मंजुषा नागपुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेस कडून अश्विनी लांडगे यांना उमेदवारी दिली गेलीय. अश्विनी लांडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव यांच्याकडे दाखल केला आहे.

पुण्यातील महापौर-उपमहापौर निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस लांब राहिला आहे. उपमहापौर पदासाठी आरपीआयकडून परशुराम वाडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधातही काँग्रेसने साहिल केदारी यांचा अर्ज दाखल केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें