घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या ज्येष्ठ महिलेला उडवलं

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाषाण रोड परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघातात 73 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली आणि वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.आशा विजयकुमार पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या पाषाण येथील अभिमनश्री सोसायटीत राहत होत्या. नेहमीप्रमाणे त्या सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चालण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) परिसरात रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडवले, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.धडक इतकी भीषण होती की आशा पाटील गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर मदत करण्याऐवजी वाहनचालक थांबला नाही आणि पसार झाला.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी थेट सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने वाहनाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. मात्र आजूबाजूच्या इमारती, एनसीएल परिसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

मृत महिलेचा मुलगा अतुल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि बेदरकार वाहनचालना या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर पाषाण, बाणेर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी चालायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित पादचारी व्यवस्था, वेगमर्यादा नियंत्रण आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें