नाशिकमधील टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या लैंगिक छळ आणि ‘कॉर्पोरेट धर्मांतर’ प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होता होऊ लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काहीजणांना अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडितांवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती समोर येऊ लागली आहे. या प्रकरणातील एका पीडितेचा एफआयआर समोर आला असून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
पीडित महिलेने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपींनी केलेल्या निर्लज्जपणाचा आणि अश्लील वर्तनाचा पाढाच वाचला आहे. “तुझ्या शारीरिक गरजा मी पूर्ण करेन,” इथपासून ते हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यापर्यंत या आरोपींची मजल गेल्याचे उघड झाले आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित महिला जून २०२५ पासून टीसीएसमध्ये असोसिएट म्हणून कार्यरत होती. तिचा पती कामाच्या निमित्ताने पुण्यात असल्याने ती नाशिकमध्ये एकटी राहत होती. याचाच गैरफायदा घेत रजा मेमन आणि शाहरुख कुरैशी या आरोपींनी तिला छळण्यास सुरुवात केली.
“पतीसोबत का राहत नाहीस?”, तुझ्या पतीपेक्षा मी देखणा आहे, जर मी तुझ्या नवऱ्याच्या जागी असतो, तर तुला कधीच एकटं सोडलं नसतं, तुझ्या शारीरिक गरजा असतील तर मी पूर्ण करेन असा धक्कादायक जबाब पीडितेने दिला. “हनिमूनला कुठे गेली होतीस?”, “तिथे काय आणि कसे केलेस?” असे अत्यंत वैयक्तिक आणि अश्लील प्रश्न विचारून तिला मानसिक त्रास दिला जात होता.
अश्लील कोडवर्ड आणि स्पर्शपीडितेने आरोप केला आहे की, ट्रेनिंग दरम्यान आसिफ अन्सारी नावाचा आरोपी तिच्या जवळ बसून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. “तुझी कोणतीही शारीरिक गरज असेल तर सांग, मी पूर्ण करेन,” अशी उघड ऑफर त्याने दिली होती. तर सीनिअर तौसीफ अत्तार हा अश्लील कोडवर्ड वापरून सलगी करण्याचा प्रयत्न करत असे. सीनीअरच्या छळाचा त्रास होत असे.
त्याला विरोध केल्यास “तुला करिअरमध्ये पुढे जायचे नाही का?” अशी धमकीही दिली जात होती. रजा मेमनचा माझ्या प्रशिक्षणाशी काहीही संबंध नसतानाही, तो माझ्या जवळ येऊन माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत असे. तो म्हणायचा की पतीसोबत का राहत नाहीस, रजा मेमनसोबत शाहरुख कुरैशीदेखील होता, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.धार्मिक भावना दुखावून धर्मांतराचा प्रयत्न?शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार आणि शफी शेख या पाच जणांनी मिळून पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
इतकेच नव्हे तर, हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत खालच्या थराचे अपशब्द वापरून तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. पीडितेने कंपनीच्या एचआर (HR) विभागाकडे दाद मागितली, परंतु तिथेही तिची दखल घेण्यात आली नाही. अखेर हतबल होऊन तिने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगतात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












