घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कल्याण-मुरबाड रायते पूल अपघात प्रकरण – टिटवाळा, मुरबाड येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

आठवड्यापूर्वी कल्याण – मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरील अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे अपघातप्रकरणी जबाबदार धरून कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांची बदली ठाणे कंट्रोल येथे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची बदली शहापूर ग्रामीणला करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे रस्ते अपघाताला जबाबदार असणारे हप्तेखोर आरटीओ, वाहतूक अधिकारी मात्र मोकाट आहेत.

टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे आजारी असल्याने त्या जागेवर मुरबाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांना प्रभारी चार्ज दिला होता. याचदरम्यान १३ एप्रिल रोजी कल्याण मुरबाड महामार्गावरील रायते पुलावर प्रवासी जीपचा भीषण अपघात होऊन ११ निष्पाप प्रवाशांचा बळी गेला.

मुळात रस्ते कामाचा ठेकेदार व हप्तेखोर आरटीओ विभागाच्या बेफिकिरीमुळे हा अपघात झाला.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा बळीओहरसीट, चुकीचे ओहरटेक, अमर्याद वेग, रस्त्यावरील अडथळे या सर्व कारणांना तसे पाहिले तर वाहतूक विभाग, आरटीओ, नॅशनल हायवे अँथोरिटी जबाबदार आहे.

असे असताना केवळ अपघात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. केवळ ठेकेदार आणि आरटीओ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा बळी दिल्याची चर्चा तालुक्यात व्यक्त होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें