घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

द्रविड हायस्कूलच्या सृष्टी पेटकरची महाराष्ट्र संघात निवड; राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सज्ज


वाई, प्रतिनिधी : द्रविड हायस्कूलमधील इयत्ता नववी ‘अ’ची विद्यार्थिनी व द्वितीय वर्षाची एनसीसी छात्र लान्स कार्पोरेल सृष्टी सचिन पेटकर हिने नेमबाजी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे द्रविड हायस्कूलसह संपूर्ण वाई तालुक्याचा गौरव वाढला आहे.
कोल्हापूर येथे १ मेपासून आयोजित करण्यात आलेल्या इंटर डायरेक्टरेट स्पोर्ट्स शूटिंग चॅम्पियनशिप (IDSSC) स्पर्धेत सृष्टीने कोल्हापूर ग्रुपचे प्रतिनिधित्व केले. २१ ते ३० मे दरम्यान झालेल्या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत तिची महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या संघात निवड झाली.
कोल्हापूर ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सात एनसीसी गटांतील कॅडेट्सचा इंटर ग्रुप स्पर्धा कॅम्प (IGC) कोल्हापूर येथे पार पडला. या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. आता केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र संघ सहभागी होणार असून त्यासाठी निवड झालेल्या कॅडेट्सचे विशेष सराव शिबिर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
सृष्टीच्या यशाबद्दल ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले, कर्नल एम. ए. राजमन्नार (सेना मेडल), कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर संजीवकुमार हिरामठ, सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट तानाजी भिसे, शालासमितीचे अध्यक्ष नितीन पोरे, सदस्य अनंत कुलकर्णी, अमित कुलकर्णी, मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, उपमुख्याध्यापिका नेत्रा मुळे, पर्यवेक्षक घनश्याम नवले, एनसीसी अधिकारी चीफ ऑफिसर महेश इनामदार, शिक्षक प्रतिनिधी उमेश लिमये तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सृष्टीला २२ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, सातारा येथील पी.आय. स्टाफ, राष्ट्रीय शूटर रत्नदीप देसाई तसेच तिचे वडील सचिन पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सृष्टीची महाराष्ट्र संघात झालेली निवड ही केवळ तिच्या वैयक्तिक यशाची बाब नसून द्रविड हायस्कूल आणि वाई शहरासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी घटना असल्याची भावना शाळा परिवाराने व्यक्त केली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करून वाईचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें