घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यातील ‘हॉटेल कॉनरॉड’च्या संचालकाला 20 लाखांचा गंडा

पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या हॉटेल कॉनरॉड मध्ये अत्यंत शिताफीने रचलेल्या सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलचे मालक असल्याचे भासवत व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी थेट फायनान्स संचालकांकडून 20 लाख 90 हजार रुपयांची रक्कम उकळली.

वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला अधिकारीही या जाळ्यात अडकल्याने, कॉर्पोरेट स्तरावर सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.याप्रकरणी हॉटेल कॉनरॉडचे डायरेक्टर ऑफ फायनान्स बीपलब चक्रबोरती यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना 8 जानेवारी 2026 रोजी घडली. त्या दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता काम करत असताना बीपलब चक्रबोरती यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. हा संदेश हॉटेल कॉनरॉड आणि पाम ग्रुप बीच हॉटेल्सचे मालक संदीप रहेजा यांच्याकडून आल्याचे भासवण्यात आले होते.

“हा माझा वैयक्तिक नंबर आहे, कुणाला शेअर करू नका,” असा विश्वासार्ह मजकूर असल्याने त्यांनी तो नंबर सेव्ह केला.यानंतर आयटीसीकडून पैसे आले आहेत का, अशी चौकशी करण्यात आली. काही वेळाने आरोपींनी बँक खात्याचे तपशील पाठवत तातडीने आरटीजीएसद्वारे 20 लाख 90 हजार 601 रुपये अमर सिंग नावाच्या खात्यात पाठवण्यास सांगितले.

आपण थेट मालकाशीच संवाद साधत आहोत, असा विश्वास असल्याने आणि कॉल न करण्याच्या सूचनेमुळे शंका न घेता बीपलब चक्रबोरती यांनी रक्कम ट्रान्सफर केली.रक्कम पाठवल्यानंतर संपर्क न झाल्याने संशय बळावला. मुंबईतील कंपनी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर मालकांनी कोणतीही सूचना दिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि फसवणूक झाल्याचे उघड झाले.

तातडीने बँक आणि 1930 हेल्पलाईनवर तक्रार देण्यात आली. मात्र तोपर्यंत रक्कम दुसऱ्या बँकेत वर्ग झाली होती.या प्रकरणाचा तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांनी वरिष्ठ अधिकारी, विश्वासार्ह भाषा आणि तातडीचा दबाव यांचा वापर करून फसवणूक कशी केली, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें